पृथ्वीपासून जवळ जवळ किती किलोमीटर अंतरापर्यंत हवा पसरली आहे?www.marathihelp.com

पृथ्वीपासून उंचावरची हवा पृथ्वी लगतच्या हवेपेक्षा विरळ असते. हवेचे पाच भाग केल्यास त्यातील एक भाग ऑक्सिजन असतो. पृथ्वीपासून जवळ जवळ ५० किमी अंतरावर हवा पसरली आहे.

वैज्ञानिक भाषेत पृथ्वीभोवतालच्या हवेच्या थराला वातावरण म्हणतात.
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे ६२ मैल (१०० किलोमीटर) अंतरावर वातावरण संपते.

या जागेत एक काल्पनिक रेषा आहे तिला कार्मन लाईन म्हणतात. तिच्या नंतर अंतराळ सुरू होते.

पृथ्वीच्या वातावरणाचे एकूण वजन ५.६×१०१५ टन (५६ लक्ष अब्ज टन, १ टन = १,०१६ किग्रॅ.) असून ते पृथ्वीच्या वजनाच्या एक दशलक्षांश आहे. वातावरण पृष्ठभागापासून वर शेकडो किमी. उंचीपर्यंत पसरलेले आहे. वातावरणाची घनता व दाब वाढत्या उंचीनुसार कमी कमी होत जातात. पण तापमानात मात्र चढ उतार होत असलेले दिसतात. पृष्ठभागालगत वातावरणाची घनता १.२९ किग्रॅ./मी.3 असून ४० किमी. उंचीवर घनता फक्त ४ ग्रॅ./मी.३ इतकी कमी होते. वातावरणाचा सुमारे ९९% भाग पृष्ठालगतच्या फक्त ३० किमी. जाडीच्या थरांत सामावलेला आहे. मानवावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या हवामानाच्या बहुतेक घटना यात थरांत घडतात. वातावरणाच्या अति-उच्च निर्वात सम विभागांत सौर प्रारण व चुंबकीय क्षेत्र यांच्या प्रभावाखाली वायुरेणूंच्या एकमेकांशी रासायनिक विक्रिया चालू असतात; पण त्याचे परिणाम भूपृष्ठाजवळ सहजपणे प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळत नाहीत. समुद्रसपाटीला सरासरी वातावरणीय दाब १,०१३ मिलिबार असतो (१ मिलिबार = १,००० डाइन/सेंमी.२ = वातावरणीय दाबाचा हजारावा भाग). पृथ्वीसभोवार पाण्याचे १० मी. जाडीचे वेष्टन आहे, असे मानल्यास ते वातावरणाइतका दाब निर्माण करील. हवेचे तापमान, आर्द्रता, वारे व ऋतू यांसारख्या घटकांच्या परिणामामुळे भिन्न ठिकाणच्या दाबांत फरक असतो. वाढत्या उंचीनुसार कोणत्याही ठिकाणावरील वातावरणाच्या स्तंभाची उंची कमी होत असल्यामुळे वातावरणीय दाब उंचीनुसार घातीय प्रमाणात कमी कमी होतो.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1050 +22