इंग्रज भारत सोडून कधी गेले?www.marathihelp.com

इंग्रज भारत सोडून कधी गेले?
इंग्रज भारतातून १९४७ साली निघून गेले,

इंग्रज भारत सोडून गेल्यावर काही इंग्रज भारतात राहिले. ह्यांना "अँग्लो इंडियन" म्हणून ओळखले जाते. ह्यांची संस्कृती इंग्रज आणि भारतीय संस्कृतीचा मिश्रण आहे. ह्यांची मातृभाषा इंग्रजी आहे आणि बरेचच्यांनी सामान्य भारतीय लोकांसोबत लग्न पण केली आहेत, त्यामुळेच अँग्लो इंडियन समाजामध्ये सुद्धा शुध्द इंग्रज जातीचे (म्हणजे " pure white race" चे लोकं, ज्यांना शासकीय कागदपत्रांमध्ये "domiciled european" म्हणून उल्लेख केला जातो), मोजकेच आहेत. अँग्लो इंडियन लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे कारण बरेच चे कॉमनवेल्थ देशांमध्ये (जसे की इंग्लंड, ऑस्ट्रेलिया) स्तलंतर होत आहेत. पण अजून ही १,५०,०००- २,००,००० अँग्लो इंडियन भारतात आहेत. प्रसिध्द अँग्लो इंडियन व्यक्तींची नावे: Ruskin Bond (उत्कृष्ट इंग्रजी लेखक, पद्मा श्री आणि साहित्य अकादमी पुरस्कारविजेते); Tom Alter (हिंदी आणि भारतीय इंग्रजी चित्रपटसृष्टीचे प्रसिध्द अभिनेते. बऱ्याच गाजलेल्या नाटकांमध्ये पण ह्यांनी काम केले आहे); Frank Anthony (लोक सभेमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे बरेच वर्षांपासून प्रतिनिधित्व केले आणि हे ICSE बोर्डाचे स्थापक आहे); Derek o Brien (माजी Quizmaster आणि सध्या त्रीनमूल काँग्रेस चे खासदार). महाराष्ट्रात आपण पाहिले तर बरेच्चे प्रसिध्द इंग्रजी माध्यम शाळा अँग्लो इंडियन लोकांनी स्थापित केलेल्या आहेत आणि बरेच वर्षांपासून महाराष्ट्रात आहेत. अँग्लो इंडियन लोकांची खाद्यपदार्थ त्यांच्या मिश्रित संस्कृती ची झलक आहे. प्रमुख अँग्लो इंडियन खाद्यपदार्थ: Kedgeree (म्हणजेच अँग्लो इंडियन पद्धतीची खिचडी); Mulligatawny soup; Jalfrezi; Railway Mutton Curry इत्यादी. ब्रिटिश काळात बरेच चे अँग्लो इंडियन रेल्वे मध्ये काम करत असत. त्यांना "कच्चा - बच्चा" म्हणून संबोधले जात असे कारण ते अर्धे युरोपियन आणि अर्धे भारतीय होते. ब्रिटिश लोकं त्यांना त्यांच्या खालची जाती म्हणून समजायचे पण सामान्य भारतीय लोकांपेक्षा त्यांना उच्च स्थान दिले जायचे. आज अँग्लो इंडियन सगळ्या देश मध्ये पसरले आहे. त्यामुळे लोक सभेमध्ये आणि काही विधान सभेमध्ये अँग्लो इंडियन साठी जागा राखीव ठेवल्या गेल्या आहेत. बरेचच्या सामान्य भारतीय लोकांमध्ये हे चुकीचं विचार आहे की अँग्लो इंडियन श्रीमंत आहे, पण असं काही नाही आहे. पारसी लोकांसारखे अँग्लो इंडियन कधीही व्यवसायात उतरले नाही आणि त्यामुळेच ते फारसे काही श्रीमंत नाही. काही लोकांना हे ही वाटते की अँग्लो इंडियन भारतामध्ये राहून इंग्लंड ची तरफदारी करतात, पण हे ही चुकीचं विचार आहे कारण भारतामध्ये राहणारे अँग्लो इंडियन स्वतःला प्रथम भारतीय म्हणूनच ओळखतात.

अँग्लो इंडियन कुठे राहतात? बंगळूरच्या Whitefield क्षेत्रात आजही अँग्लो इंडियन आहेत (अँग्लो इंडियन लोकांनी ब्रिटिश काळी Whitefield ची स्थापना केली होती). केरळच्या Thalassery शहरात आणि झारखंडच्या McCluskieganj मध्ये पण ह्या लोकांची वस्ती आहे. भारताच्या इंग्रज स्थापित गिरिस्थानमध्ये आजही मोजके अँग्लो इंडियन कुटुंब राहतात. कलकत्ता मध्ये Bow Barracks भागात अँग्लो इंडियन ची मोठी वस्ती आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, महाबळेश्वर आणि पांचगणी सारख्या ठिकाणी ह्यांची मोजकी कुटुंब आहे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:46 ( 1 year ago) 5 Answer 6244 +22