आर्थिक वृद्धी का आवश्यक आहे?www.marathihelp.com

आर्थिक वृद्धी –

देशातील एकूण वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ होणे म्हणजे आर्थिक वृद्धी होय. आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न सतत वाढत गेले तर त्याला आर्थिक वृद्धी म्हणता येते. मात्र राष्ट्रीय उत्पन्न अचानक वाढले तर त्याला आर्थिक वृद्धी म्हणता येत नाही. आर्थिक वृद्धी चे मोजमाप जीडीपीच्या आधारे केले जाते. GDP सतत वाढत जाणारा असेल तर आर्थिक वृद्धी झाली असे म्हणता येईल.

आर्थिक वृद्धी का आवश्यक आहे?

आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक वृद्धी पेक्षा वेगळी आहे आणि व्यापकहि आहे. आर्थिक विकास ही एक गुणात्मक संकल्पना आहे. यासाठी विकासाची व्याख्या समजून घेणे आवश्यक ठरते. विकास म्हणजे कोणत्याही एका बाजूने झालेली प्रगती नव्हे तर सर्वांगीण झालेली प्रगती म्हणजे विकास म्हणतात. आर्थिक विकासातही विकासाची संकल्पना व्यापक आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. मानवी जीवनमानाचा दर्जा उच्चतम पातळीला नेण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक विकास संकल्पना मांडता येते.

विकासामध्ये आर्थिक वृद्धी बरोबरच राष्ट्रीय उत्पन्नाचा वितरणातील इच्छित बदल आणि इतर तांत्रिक व संस्थात्मक बदल यांचा समावेश होतो. आर्थिक वृद्धी होत असताना दरडोई उत्पन्न दारिद्र्य बेरोजगारी वितरण व्यवस्था इत्यादी मध्ये काय बदल होत आहे यातून आर्थिक विकास सूचित होत असतो. म्हणजेच आर्थिक वृद्धी मुळे निर्माण होणारे फायदे हे मर्यादित लोकसंख्य पुरते न राहता सर्वांगीण विकास व सामाजिक,आर्थिक कल्याण साधत असेल तरच त्याला आर्थिक विकास म्हटले जाईल.

आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी या परस्परपूरक संकल्पना असून आर्थिक वृद्धी चे फायदे समाजातील सर्व घटकांना उपलब्ध होणे म्हणजे आर्थिक विकास होय. यावरून आर्थिक विकासाची संकल्पना पुढीलप्रमाणे मांडता येईल.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 16:19 ( 1 year ago) 5 Answer 7242 +22