६ प्रबोधन युग म्हणजे काय ते स्पष्ट करा?www.marathihelp.com

१८१८ मध्ये पेशवाई बुडाली आणि महाराष्ट्रात मन्वंतर घडले. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत 'जुने' मागे पडू लागले आणि त्याची जागा 'नवे' घेऊ लागले. म्हणूनच या नव्या युगाला 'प्रबोधन'युग असे संबोधण्यात येते.

१८१८ मध्ये पेशवाई बुडाली आणि महाराष्ट्रात मन्वंतर घडले. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत 'जुने' मागे पडू लागले आणि त्याची जागा 'नवे' घेऊ लागले. म्हणूनच या नव्या युगाला 'प्रबोधन'युग असे संबोधण्यात येते. पण हे प्रबोधन काही आपोआप घडले नाही. त्यासाठी अनेक प्रतिभवान, बुद्धिमान, त्यागी, ध्येयवादी र्कत्या समाजधुरीणांनी सर्वस्व पणाला लावले. एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनर्कत्यांची परंपरा विसाव्या शतकातही सुरू राहिली. त्या सर्वांच्या कार्यातून आज हा एकविसाव्या शतकातील, सुवर्णमहोत्सव साजरा करणारा महाराष्ट्र घडला आहे. 'महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला' (संच) म्हणजे या निमित्ताने केलेले केवळ स्मरणरंजन नव्हे. महाराष्ट्राच्या या पुढील वाटचालीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांना आपल्या कर्तव्याचे सम्यक दर्शन घडवणे, स्फूतीर् देणे आणि मार्गदर्शन करणे हे या चरित्र-ग्रंथमालेचे उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच ही सर्व चरित्रे नव्याने लिहून घेतली आहेत. यापूवीर् प्रसिद्ध झालेली चरित्रे या अपेक्षांना उतरतील असे नाही. काही चरित्रांचा भर वैयक्तिक जीवनावर असतो तर काहींचा फक्त कार्यावर. काही चरित्रे फारच त्रोटक तर काही फार प्रदीर्घ. त्या चरित्रांचा या योजनेत समावेश केला असता तर या मालेला एकात्मता, एकरूपता लाभली नसती. या योजनेतील चरित्रलेखकांना ही चरित्रे कशी असावीत, त्यांच्यापासून काय अपेक्षा आहेत हे सांगण्यासाठी चरित्रलेखनाचे एक टिपण संपादकांनी तयार केले होते ते सर्व चरित्र लेखकांना देण्यात आले. चरित्र-लेखनाचे वेगवेगळे प्रकार, त्यातील धोके व सांभाळावयाची पथ्ये यापासून ते सदंर्भ कसे द्यावेत, येथपर्यंतच्या सूचना त्या टिपणात होत्या.


चरित्रलेखन हा इतिहासलेखनाचाच एक भाग आहे. मराठीत इतिहासलेखन व इतिहासाधारित लेखन विभूतिपूजेचाच अवलंब करते. वस्तुनिष्ठ, चिकित्सक, समतोल आणि व्यक्ती व तिचा काळ यांच्यातील संबंधांचे विश्लेषण करणारी आटोपशीर चरित्रे फारशी आढळत नाहीत. या चरित्र-ग्रंथमालेने ही उणीव भरून निघेल असे वाटते.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा 'महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान व र्कत्या लोकांची मोजदाद' हा निबंध प्रसिद्ध आहे. (राजवाडे लेखसंग्रह, भाग ३) त्यात त्यांनी सार्वकालीन महत्त्वाच्या अशा ४३ व्यक्तींची यादी दिली आहे. त्या सर्व व्यक्ती एकोणिसाव्या शतकातील आहेत. त्यातील २८ व्यक्ती निवडून त्या यादीत विसाव्या शतकातील तितक्याच तोलामोलाच्या ३२ व्यक्तींची भर प्रकाशक, संपादक, साहाय्यक संपादक आणि सल्लागार यांनी घातली. अशा रीतीने सिद्ध झालेल्या यादीतील व्यक्तींच्या चरित्रांचा, कर्तृत्वाचा ज्यांनी संशोधनपूर्वक अभ्यास केला आहे अशा लेखकांचा शोध घेण्यात आला आणि त्यांच्यावर चरित्रलेखनाची जबाबदारी सोपवण्यात आली. अशा रीतीने प्रदीर्घ चर्चा व विचार आणि चार वर्षांची मेहनत यांतून ही चरित्र ग्रंथमाला सिद्ध झाली.

राजकारण, समाजकारण, समाजसेवा, समाजसुधारणा, पत्रकारिता, साहित्य, तत्त्वज्ञान, शिक्षण, इतिहाससंशोधन, अशा अनेक क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या या व्यक्तींमध्ये जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, लोकहितवादी, महात्मा फुले, बाबा आमटे, न्यायमूतीर् रानडे, विष्णुशास्त्री चिपूणकर, अण्णासाहेब किलोर्स्कर, लोकमान्य टिळक, आगरकर, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, सयाजीराव गायकवाड, शाहूमहाराज, बाबासाहेब आंबेडकर, महषीर् विठ्ठल रामजी शिंदे, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनोबा भावे, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, विठ्ठलराव विखे-पाटील, धनंजयराव गाडगीळ, कॉम्रेड डांगे इत्यादी एकसष्ट धुरीणांचा समावेश आहे. त्यांची चरित्रे म्हणजे महाराष्ट्राचा गेल्या दोनशे वर्षांचा अभिमानास्पद इतिहास आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 416 +22