स्पर्धात्मक मागणी म्हणजे काय?www.marathihelp.com

मागणीचे प्रामुख्याने पुढील प्रकार पडतात.

1 ) प्रत्यक्ष मागणी :-
प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी ग्राहक ज्या वस्तूंची मागणी करतो अशा वस्तूंची मागणी प्रत्यक्ष मागणी समजली जाते.
उदा. आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अन्न , वस्त्र, निवारा, शिक्षण ,औषधे, प्रवास, पेन ,वही ,पुस्तक, घड्याळ अशा अनेक उपभोग्य वस्तूंची मागणी करत असतो याला प्रत्यक्ष मागणी म्हणतात.

2) अप्रत्यक्ष मागणी ( परोक्ष मागणी ) :-
ग्राहकांना लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी ज्या उत्पादक घटकांची मागणी केली जाते त्याला अप्रत्यक्ष किंवा परोक्ष मागणी म्हणतात.
उदा. ग्राहकांना लागणारे कापड, साखर इ. वस्तूंची मागणी वाढल्यास त्या वस्तू तयार करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल ,आणि संयोजक या चार उत्पादक घटकांची मागणी वाढवली जाते. त्यामुळे या चार उत्पादक घटकांची मागणी अप्रत्यक्ष समजली जाते.

 3) संयुक्त मागणी किंवा पूरक मागणी :-
ज्यावेळेस एक गरज पूर्ण करण्यासाठी एकापेक्षा जास्त वस्तूंची एकत्रित खरेदी करावी लागते तेव्हा अशा सर्व वस्तूंच्या मागणीस संयुक्त किंवा पूरक मागणी म्हणतात.
उदा. स्कूटर व पेट्रोल तसेच पेन व शाई या प्रकारच्या एक गरज पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे खरेदी कराव्या लागणाऱ्या वस्तूंच्या मागणीस संयुक्त किंवा पूरक मागणे आणतात.

4 ) संमिश्र मागणी :-
 ज्या वेळेस एखाद्या वस्तूचा वापर अनेक उपयोगासाठी केला जातो तेव्हा अशा वस्तूच्या मागणीस संमिश्र मागणी म्हणतात.
उदा. वीज, दगडी कोळसा ,कॉम्प्युटर इ. वस्तूंचा अनेक व्यवसायात अनेक उपयोगासाठी केला जातो त्यांची मागणी संमिश्र समजली जाते..

5 ) स्पर्धात्मक मागणी :-
ज्या वस्तू एकमेकांना पर्याय असतात त्यांची मागणी स्पर्धात्मक असते 
उदा. चहा आणि कॉफी तसेच साखर व गूळ या एकमेकांना पर्यायी वस्तू आहेत त्यांची मागणी स्पर्धात्मक असते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:42 ( 1 year ago) 5 Answer 4715 +22