सकारात्मक म्हणजे काय?www.marathihelp.com

सकारात्मक विचार म्हणजे आशावादी मानसिकता असे म्हटले जाते. कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याची कृती म्हणजेच सकारात्मक विचार

होय. सकारात्मक विचारांमुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम होण्याची क्षमता असते. आशावाद आणि सकारात्मक विचारांचा मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या संदर्भात विस्तृत अभ्यास केला गेला आहे. त्यामुळे आरोग्यदायी जीवनासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.

सकारात्मक विचारांमुळे होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

दीर्घ आयुर्मान
हृदयविकारापासून सुटका
चांगले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ
रक्तदाबावर नियंत्रण
ताण व्यवस्थापन
सहनशीलतेत वाढ

तसंच याचे काही मानसिक फायदेही आहेत:

अधिक कल्पकता
समस्या सोडवण्याच्या क्षमतेत वाढ
विचारांची अधिक स्पष्टता
मूड सुधारणे
प्रसंगाशी सामना करण्याच्या क्षमतेत वाढ
उदासीनता कमी होणे

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:51 ( 1 year ago) 5 Answer 76 +22