संयुक्त राष्ट्र संघटनेने नोंदणी केलेले एकूण राष्ट्र किती आहेत?www.marathihelp.com

जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून ’संरा’ आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात. संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत : आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा); सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी); आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासास चालना देण्यात सहकार्यासाठी); सचिवालय (’संरा’ला आवश्यक अभ्यासकार्ये, माहिती आणि सुविधा देण्यासाठी); आंतरराष्ट्रीय न्यायालय (प्रमुख न्यायिक अंग) आणि ’संरा’ विश्वस्त संस्था (सध्या अक्रिय). ’संरा’ व्यवस्थेतील इतर प्रमुख संस्थांमध्ये विश्व स्वास्थ्य संघटना, विश्व अन्न कार्यक्रम आणि युनिसेफ यांचा समावेश *होतो. महासचिव ही ’संरा’ची सर्वात ठळक व्यक्ती असते आणि २००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाचे बान की-मून यांनी मिळविले. सदस्य राष्ट्रांकडून मिळणाऱ्या निर्धारित आणि ऐच्छिक देणग्यांमधून संस्थेला वित्तपुरवठा होतो आणि अरेबिक, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या तिच्या सहा अधिकृत भाषा आहेत. ही विश्वसंघटना आहे. सचिवालयातील मुख्य हा महासचिव आहेसयुक राज्यशांतता प्रशापित करतात.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 08:58 ( 1 year ago) 5 Answer 911 +22