शिवकाळात किती टक्के शेतसारा आकारण्यात येत असे?www.marathihelp.com

शिवकाळात किती टक्के शेतसारा आकारण्यात येत असे?

हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार सहा खात्यांमध्ये विभागला गेलेला होता.त्यापैकी एक अर्थ व महसूल खाते होते.अष्टप्रधानांमधील मुजुमदार (अमात्य) हे पद महसूल खात्याशी संबंधित होते- रामचंद्रपंत निळकंठ हे महसूल मंत्री होते,तर सुरनीस (सचिव) हे पद अर्थखात्याशी संबंधित होते.अण्णाजी दत्तो हे अर्थमंत्री होते.

राज्याचे उत्पन्न व खर्च याबाबतीत व्यवहार पाहण्याचे काम अर्थ खात्याकडून होत असे.

महसूलाचे प्रमुख स्रोत :-

जमीन महसूल.
शेतसारा-१/३.
जकात कर.
व्यवसाय कर.
घरपट्टी-घरटका.
मिठावरील,गाई,बैल-म्हशींच्या खरेदी-विक्री वरील कर-'शिंगोटी',तसेच नगदी पिकांवरील कर.
इनामपट्टी,मिरासपट्टी,सराफपट्टी.
अलुतेदार-बलुतेदार यांच्यावरील कर.
वेठबिगारी-गुलामांवरील कर-आकारणी.
आयात-निर्यात कर.
घोड्यावरील कर-'तेजी/ताजी' ,उंटाच्या वाहतुकीवरील कर-'उंटपट्टी'.
लग्नटका/वरातटका व पाटदाम.
भूतफरोसी-खेळणी विक्रेत्यांवरील कर.

याशिवाय लढाईत जप्त केलेली संपत्ती,चौथाई,सरदेशमुखी यांच्या माध्यमातून महसूलप्राप्ती होत असे.या सर्व जमा-खर्चाचा हिशेब ठेवण्याचे सूत्रबद्ध काम अर्थखाते व महसूल खात्याकडून चोख पद्धतीने केले जाई.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:15 ( 1 year ago) 5 Answer 6444 +22