वैधानिक अधिकार म्हणजे काय?www.marathihelp.com

वैधानिक, नैतिक आणि मानवी इत्यादी आधारावर अधिकाराचा दावा केला जातो. अधिमान्य सत्तेला अधिकार म्हणतात. अधिमान्य सत्ता म्हणजे ज्यांच्यावर सत्ता वापरली जाते त्यांना तो सत्तावापर मान्य असतो. ज्या प्रकियेतून सत्तेचा वापर अधिमान्य बनतो असा अधिकार असणाऱ्या व्यक्तीच्या आज्ञा पाळल्या जातात.

अधिकार :

कोणती कृती अनुज्ञेय आहे आणि कोणती संस्था कायदेशीर आहे ह्या आधुनिक संज्ञेवर अधिकार ही संकल्पना आधारलेली आहे. अधिकाराचा एक संच स्वीकारणे म्हणजे स्वातंत्र व अधिकाराचे वितरण मंजूर करणे होय आणि काय होऊ शकते, काय केले पाहिजे आणि काय केले जाऊ नये यासंबंधी एका विशिष्ट उद्देशाचे समर्थन करणे होय. या अर्थाने अधिकार काही विशिष्ट क्रिया करण्यासाठी आहेत (किंवा नाहीत). विशिष्ट राज्यात असणाऱ्यांना क्रिया करण्यासाठी अधिकार असतो (किंवा नसतो) तसेच ठराविक राज्यात अधिकार असू शकतात (किंवा नसतात). व्यक्तीला जे प्राप्त होणे योग्य आहे ते मिळावे असा अधिकार संकल्पनेचा अर्थ आहे. उदा. मतदान करणे, भाषण करणे इत्यादी. परंतु राजकीय उत्तरदायित्वापासून अधिकार संकल्पना वेगळी आहे. अधिकार आणि उत्तरदायित्व या संकल्पनांचा अर्थ सामान नाही ; परंतु संज्ञांचा परस्पर संबंध आहे. वैधानिक, नैतिक आणि मानवी इत्यादी आधारावर अधिकाराचा दावा केला जातो. अधिमान्य सत्तेला अधिकार म्हणतात. अधिमान्य सत्ता म्हणजे ज्यांच्यावर सत्ता वापरली जाते त्यांना तो सत्तावापर मान्य असतो. ज्या प्रकियेतून सत्तेचा वापर अधिमान्य बनतो असा अधिकार असणाऱ्या व्यक्तीच्या आज्ञा पाळल्या जातात. कारण तिला अशा आज्ञा देण्याचा अधिकार आहे हे संबंधितांनी मान्य केलेले असते. म्हणूनच शासन हे अधिकारावर आधारित असावे असा आग्रह सिद्धांतांमध्ये दिसून येतो. उदा. संमतीचा सिद्धांत, सहमतीचा सिद्धांत. कोणताही अधिकार संबंधितांच्या संमतीनेच अधिमान्य बनतो. तसेच संमतीमधून अधिकारी व्यक्तीला कृतीचा हक्क प्राप्त होतो.

अधिकार आणि सत्ता यांच्यात महत्वाचा फरक आहे. एखाद्या व्यक्तीला सत्ता असणे म्हणजे विशिष्ट कृती करण्याची शक्ती असते. पण त्या व्यक्तीला ती कृती करण्याचा हक्क असेलच असे नव्हे. याउलट अधिकार असणे म्हणजे विशिष्ट कृती करण्याचा हक्क मिळतो. सत्ता ही मुख्यतः दंडशक्ती वापरण्याच्या कुवतीवर किंवा क्षमतेवर आधारित आहे. तर अधिकार हा अधिमान्यतेवर आधारित आहे. दोहांमध्ये व्यक्ती-व्यक्तींमधील वर्चस्वसंबंध दिसतात ; परंतु वर्चस्व स्थापनेला जेव्हा अधिमान्यता मिळते तेव्हा तो अधिकार असतो. अधिकाराचे समर्थन तीन आधारांवर केले जाते. अ) समाजाचा एक घटक ह्या नात्याने व्यक्तीला अधिकार मिळावेत. ब) व्यक्तीला समाजात योग्य भूमिका निभावण्यासाठी अधिकार आवश्यक आहे. क) व्यक्तीला अधिकार मिळण्यासाठी तिने इतरांच्या अधिकारांचा सन्मान केला पाहिजे.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 16:44 ( 1 year ago) 5 Answer 5181 +22