विधानसभेचे सदस्य कोण असतात?www.marathihelp.com

महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला ही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर अगदी छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री पदी आलेले देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली. व त्यानंतर थोड्याच दिवसांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यानंतर जून-जुलै २०२२ मध्ये शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केले, आणि शिवसेना आणि भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले.

विधानसभा हे राज्य कायदेमंडळाचे कनिष्ठ पण अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ असलेले जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असतात मात्र लहान राज्याच्या विधानसभा अपवाद आहेत. उदा. सिक्किम विधानसभा 32 सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 344 +22