विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

विकास (Development) म्हणजे काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे गुणात्मक, प्रकारात्मक किंवा दर्जात्मक अधिक्य होय. विकास शारीरिक किंवा इतर कोणत्याही संस्थेत (abstract/system) उदा. अर्थव्यवस्था, प्रणाली इ. मध्ये होऊ शकतो. सहसा तो ठराविक एककाच्या पटीत मोजता येत नाही. विकासाच्या मोजमापासाठी वेगळे (सहसा अंमूर्त किंवा संकल्पनात्मक) निकष लावावे लागतात.

काळानुसार अधिक्य होणे हे वाढ आणि विकास या दोन्हींमधे समान असले तरी वाढीत प्रमाणात्मक व विकासात गुणात्मक अधिक्य अभिप्रेत आहे.

उदाहरणार्थ:

संतुलित आहारामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते.
वयाबरोबर (वाढ) माणसाची प्रगल्भता (विकास) वाढते.
गेल्या काही वर्षांत बँकेच्या ग्राहकसेवेत खूपच वाढ झाली आहे.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 08:58 ( 1 year ago) 5 Answer 918 +22