मराठी साहित्याची किती अंगे आहेत?www.marathihelp.com

मराठी साहित्याची किती अंगे आहेत?

साहित्यकृतीचाी सात अंगे

साहित्य, काव्य ही एक व्यामिश्र, अनेकांगी घटना आहे. या व्यामिश्र घटनेच्या कोणत्या अंगावर भर द्यायचा यावरून साहित्यात वेगवेगळे संप्रदाय वा सिद्धांन्त निर्माण झाले आहेत. साहित्यकृतीच्या संदर्भात अनेक अंग प्रस्तुत असताना एक व दोन अंगावर भर देऊन साहित्याची जी व्याख्या केली जाते ती नेहमीच अपुरी, एकांगी राहाते. साहित्याची, काव्याची एकच एक व्याख्या देता येत नसली तरी साहित्याच्या स्वरूपाची चर्चा करताना आपल्याला त्यांची अनेक अंगे विचारात घ्यावी लागतात.

१.भाषिक अंग' - साहित्यकृती शब्दांनी युक्त, या शब्दांचे ध्वनिरुप, अर्थरुप, वाक्यविन्यासात्मक अंग

२.आशयात्मक अंग' - शब्द अर्थयुक्त, साहित्यकृतीतील आशय मानसिक, आंतरिक, सामाजिक-राजकीय असा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो.

३.'रुपबंधात्मक/संरचनात्मक अंग' - शब्द, वाक्य, प्रतिमा, बंध, कथाबीज, कथानर, पात्रे आदी घटकांनी मिळून साहित्यकृती संघटित होते. ही सेंद्रिय एकात्मता असते.

४.'कल्पकतेचे अंग' - साहित्यकृतीतील पात्रे, घटना, कथानक हे घटक एक कल्पित विश्व निर्माण करतात. हे कल्पितविश्व प्रत्यक्ष जीवनाची अनुकृती असेल वा नसेल.

५.'प्रकारात्मक अंग' - साहित्यकृती कथा, कादंबरी, कविता अशा कोणत्यातरी प्रकारात सामावते. त्या साहित्यप्रकाराची वेगळी वैशिष्ट्ये असतात.

६.'कलात्मक अंग' - साहित्यकृतीचे साहित्यपण, कलापण कोणत्यातरी घटकात असते. उदा. रस, असंकार, ध्वनी इ.

७.'सत्ताशास्त्रीय अंग' - प्रत्येक साहित्यकृतीत एक अस्तित्व असते. साहित्याचे अस्तित्व भौतिक नाही, ते वेगळेच असते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:20 ( 1 year ago) 5 Answer 5419 +22