भारताचे पहिले नाव काय?www.marathihelp.com

भूतकाळात आपला भारत देश हा इतरही बऱ्याच नावांनी ओळखला जात असे.

जांबूद्वीप :

जांबूद्वीप हे भारताचं खूप जुनं नाव आहे. याचा शब्दशः अर्थ जांब वृक्षांची जमीन. भारताचा हा उल्लेख विविध धार्मिक ग्रंथात वाचावयास मिळतो.

जांब म्हणजे जांभूळ आणि द्वीप म्हणजे विस्तीर्ण प्रदेश.

नाभिवर्ष :

जैन साहित्यात, भारताला नाभिवर्ष या नावाने ओळखले जाते. नाभी हा चक्रवर्ती राजा होता आणि पहिल्या जैन तीर्थंकर रिषभनाथाचा तो वडील होता.

पुरातन भारतीय ग्रंथात नाभिवर्ष याची आणखी एक व्याख्या सापडते. हिंदू ग्रंथानुसार, नाभी म्हणजे ब्रह्मदेवाची नाभी आणि वर्ष म्हणजे देश. ब्रह्मदेव हा हिंदू तत्वज्ञानात विश्वनिर्माता मानला जातो. म्हणून हे नाव.

आर्यवर्त/ द्रविड :

संस्कृत साहित्यात आर्यवर्त हे नाव उत्तर भारतासाठी वापरले आहे. मनुस्मृतीमध्ये हा हिमालयीन रांगा आणि विंध्य पूर्वेच्या पर्वतरांगांमधील बंगालच्या उपसागरापासून अरेबियन समुद्रामधील मार्ग असल्याचे म्हटले आहे.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:51 ( 1 year ago) 5 Answer 82 +22