प्रमाणित प्रत म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रमाणित प्रत म्हणजे काय?

एका न्यायालयाच्या अधिकाऱ्याने दुसऱ्या न्यायालयाच्या माहितीसाठी दिलेल्या एखाद्या वस्तुस्थितीबद्दलचे अधिकृत लेखी निवेदन म्हणजे प्रमाणित प्रत, असे म्हणतात.

प्रमाणपत्र : (सर्टिफिकेट). प्रमाणपत्र म्हणजे एखाद्या लिखित मजकुराच्या खरेपणाबद्दल प्रमाणित केलेले निवेदन. प्रमाणपत्रासाठी पुष्कळदा दाखला अशीही संज्ञा वापरण्यात येते. प्रमाणपत्रातील मजकूर प्रमाणभूत मानला जातो. म्हणजे तो अधिकृत आहे, सत्य आहे, याची खात्री प्रमाणपत्रावरून होते. प्रमाणपत्रांचे अनेक प्रकार संभवतात. उदा., विक्रीचे प्रमाणपत्र, वारसाहक्कचे प्रमाणपत्र, विद्यापीठीय पदव्या किंवा पदविका यांचे प्रमाणपत्र इत्यादी.

सामान्यतः विशिष्ट विषयातील प्रमाणपत्रे विशिष्ट रीतीने किंवा रकान्यातून देण्याची पद्धत आहे. उदा., न्यायालयीन कामकाजासंबंधी असलेली प्रमाणपत्रे किंवा विद्यापीठीय पदवीसंबंधीची प्रमाणपत्रे एका विशिष्ट परिभाषेत व नेमून दिलेल्या प्रपत्रानुसार असतात.

प्रमाणित करणे हासुद्धा एखादा मजकूर अधिकृत आहे, हे दर्शविण्याची रीत होय. इंग्रजीत काही शब्द या दृष्टीने वापरले जातात व त्यांना पारिभाषिकत्वही प्राप्त झालेले दिसते. उदा., ‘सर्टिफाय’ म्हणजे प्रमाणित करणे वा दाखला देणे, ‘ॲटेस्ट’ म्हणजे अनुप्रमाणित करणे, ‘ऑथेंटिकेट’ म्हणजे अधिप्रमाणन करणे इत्यादी. व्यवहारात अनेक प्रकारच्या लिखित माहितीला अधिकृत म्हणून अशा विविध संज्ञांनी प्रमाणित केले जाते. उदा., एखाद्या व्यक्तीच्या वर्तनासंबंधी दिलेला दाखला किंवा प्रमाणपत्र. शासकीय प्रशासनात तसेच इतरही सार्वजनिक व्यवहारात एखादे निवेदन प्रमाणित करण्याची कार्यपद्धती ठरलेली असते तसेच विशिष्ट व्यक्तींना वा अधिकाऱ्यांना तत्संबंधीचे अधिकार असतात.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 11:23 ( 1 year ago) 5 Answer 7698 +22