पत्र लेखनाचे तंत्र किती आहे?www.marathihelp.com

पत्र लिहिण्याचे दोन प्रकार आहेत.

१) औपचारिक पत्र : कार्यालयीन तसेच व्यवसायिक पत्रांचे स्वरूप हे औपचारिक असते. काही औपचारिक कामासंबंधात विशिष्ठ व्यक्तींशी, संस्थांशी किंवा शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरूपात साधलेला संवाद म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार होय.

औपचारिक पत्राचे पुन्हा काही प्रकार पडतात.

तक्रार पत्र
चौकशी पत्र
मागणी पत्र
विनंती पत्र
अभिनंदन पत्र, शुभेच्छापत्र
मानपत्र
निमंत्रण पत्र
आभार पत्र
अर्ज लेखन


२) अनौपचारिक पत्र : अनौपचारिक पत्र हे मित्र, नातेसंबंधी, कुटुंबातील सदस्य व इतर नात्यातील ओळखीच्या लोकांना लिहिले जाते. या पत्रात सुखदुःख, उत्साह, प्रेम, अभिनंदन व शुभेच्छा इत्यादींचा समावेश असतो. अनौपचारिक पत्राची भाषा सौम्य हृदयस्पर्शी व प्रेमळ असते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 4910 +22