नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता?www.marathihelp.com

नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता?

स्थापना : – ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था दादाभाई नौरोजींनी १ डिसेंबर १८६६ रोजी लंडन मध्ये स्थापन केली.

इंग्रज व हिंदी लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल असलेला गैरसमज करणे आणि इंग्रजांना भारतीयांच्या अडचणीची माहिती करुन देणे हे या सभेचे उद्दिष्ट होते.

ह्या असोसिएशनच्या वतीने

हिंदुस्थान संबंधी इंग्लंडची कर्तव्ये,
हिंदूस्थानमधील पाटबंधारे व कालवे,
सिव्हील सर्व्हिसची परिक्षा
या विषयासंबंधी इंग्लंडमधील लोकांना माहिती करुन देण्यात आली.

इ.स.१८६९ मध्ये दादाभाई नौरोजी हिंदुस्थानात आले.

हिंदूस्थानातील राजे रजवाड्यांकडून आपल्या कार्यास अर्थसहाय्य मिळावे यासाठी काठेवाडाती संस्थानांचा दौरा काढून कच्छ, जुनागड, गोंडल येथून रक्कम जमा केली. 

मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखा उघडण्यात आल्या.

मुंबई शाखेच्या कार्यकारिणीवर

सर जमोटजी जिजीभॉय,
मंगलदास नथूभाई,
प्रामजी नसरवानजी पटेल,
डॉ. भाऊ दाजी,
फिरोजशहा मेहता,
बाळ मंगेश वागळे

हे कार्यकर्ते कार्यरत होते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:08 ( 1 year ago) 5 Answer 6187 +22