देशाचा सुरक्षेत प्रधानमंत्री यांची भूमिका काय?www.marathihelp.com

देशाचा सुरक्षेत प्रधानमंत्री यांची भूमिका काय?

देशाच्या सुरक्षेत प्रधानमंत्री यांची भूमिका खालीलप्रमाणे,
सरकारच्या कार्यकारिणी शाखेचे संचालन करणारा राजकीय नेता म्हणजे पंतप्रधान असतो. पंतप्रधान हा आपल्या देशातील संसदेचा सदस्य असतो. देशाचे पंतप्रधान हे सरकारच्या धोरणासाठी आणि निर्णयांसाठी जबाबदार असतात.

भारताचे पंतप्रधान हे भारत देशामधील केंद्रीय सरकारचे प्रमुख व देशाच्या राष्ट्रपतीचे प्रमुख सल्लागार आहेत. पंतप्रधान, भारताच्या मंत्रीमंडळाचा व संसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचा नेता आहे. भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा तो प्रमुख आहे.

पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभा व राज्यसभा ह्या दोन भवनांपैकी एकाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. विद्यमान राष्ट्रपतीने नियुक्ती केलेला भारताचा पंतप्रधान देशामधील सर्वात बलाढ्य नेता समजला जातो. सरकारची स्थापना, मंत्रीमंडळाची निर्मिती, मंत्र्यांना पदे नियुक्त करणे इत्यादी महत्त्वाचे अधिकार पंतप्रधानाला आहेत. पंतप्रधानाचा मृत्यू अथवा राजीनाम्यानंतर मंत्रीमंडळ बरखास्त केले जाते.

नियुक्ती
भारतामध्ये साधारणपणे दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुका घेतल्या जातात. ह्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला भारताचे विद्यमान राष्ट्रपती सरकार स्थापनेचे आमंत्रण देतात. ह्या राजकीय पक्षामधील प्रमुख नेत्याची पक्षातर्फे पंतप्रधान म्हणून निवड केली जाते. सरकार स्थापन केल्यानंतर ठराविक काळामध्ये त्याला बहुमत सिद्ध करणे बंधनकारक आहे. ह्यासाठी सरकार स्थापन करणारा पक्ष इतर पक्षांचा पाठिंबा घेऊ शकतो.

पात्रता

भारताच्या संविधानाच्या ७५ व्या व ८४व्या कलमांनुसार पंतप्रधान बनण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

भारत देशाचे नागरिकत्व
लोकसभा अथवा राज्यसभेचा खासदार. सरकार स्थापनेच्या वेळेला जर ही अट पूर्ण झाली नसेल तर त्या व्यक्तीला ६ महिन्यांच्या आत खासदार पद मिळवावे लागते.
लोकसभेचा सदस्य असल्यास किमान वय २५ वर्षे व राज्यसभेचा सदस्य असल्यास किमान वय ३० वर्षे.
केंद्रीय सरकार, राज्य सरकार इत्यादी सरकारी कार्यालयामध्ये फायदा असलेल्या पदावर नसणे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 6223 +22