देवक कसे ओळखावे?www.marathihelp.com

देवक म्हणजे काय ?

विवाह इत्यादी कार्यामध्ये क्षात्रसमाजात आवर्जुन एखाद्या वॄक्ष, फूल, पान्, वेल, सोने,काही वेळा कोचा सारखे जंगली फळ, केर, साळूंखी-मोर अशा पक्षांचे पिस, शस्त्र अशा गोष्टिं पैकी एका ची आपआपल्या घराण्याच्या रीती प्रमाणे अग्रमानाने पूजा केली जाते त्यास देवक असे म्हणतात. काही ठीकाणी ह्यास कुळाची फांदी असे देखील बोलतात.

त्या त्या देवका च्या मुळाशी आपली कुलदेवता निवास करते . विवाह जूळ्वताना पत्रिका मेलन गोत्र नातेसंबध या खेरीज कुळी व देवक यांचाही आवर्जून विचार केला जातो. काश्यप गोत्र सोडून इतर गोत्र व देवक एकच आल्यास विवाह टाळतात.
वास्तविक पहाता देवक हा सापिण्ड्य पाह्ण्याचाच एक प्रकार आहे. नाते संबध पहाणे, पदर लागणे अशा गोष्टी,
वंश पहाणे, हे सर्व कुळ गोत्राचे प्रवर पहाण्या सारखाच प्रकार आहे. बर्‍याच वेळेस आडनाव हे गावांची नावे, व्यवसाय, किंवा पुर्वापार मिळलेली पदवी अशा स्वरुपाचे असते म्हणून देवक पहाण्याची प्रथा पडलेली आहे.

घरातील शुभकार्य व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडावे, म्हणून घरात कुलदैवत आणि विविध देवी देवतांची स्थापना करून पूजा केली जाते यांस ' देवक '

पूजणे अथवा ठेवणे म्हणतात. देवक फक्त ज्येष्ठांकडूनच पूजले जाते, अन्यथा घरातील कोणीही पुरूष व्यक्ति चालते.

देवकाआधी सर्व घार्मिक विधी कराव्या लागतात, कारण प्रत्यक्ष देवच आपल्या घरी आल्याची भावना असते. म्हणून ब्राह्मणाकडून पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध,

मातृकापूजन केले जाते.

विवाहप्रसंगी वर आणि वधू, दोघांचेही घरी शुभ कार्य असल्याने देवक बसविले जाते.

देवक बसविल्यानंतर त्या घरातील कोणीही व्यक्ति कोणत्याही अशुभ कार्याला हजेरी लावत नाही. एकदा देवक बसविल्यानंतर त्या घरात कांहीही अशुभ घटना

घडली तरी विवाह थांबत नाही अगदी घरात कोणी दगावले असतांना सुद्धां.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 5925 +22