खाजगी क्षेत्रातील वित्तीय व्यवहारांना काय म्हणतात?www.marathihelp.com

खाजगी क्षेत्रातील वित्तीय व्यवहारांना काय म्हणतात?
खाजगी क्षेत्रातील वित्तीय व्यवहारांना खाजगी आयव्यय म्हणतात.

खाजगी व्यक्ती, कुटुंब आणि संस्थांचा समावेश होतो. सार्वजनिक आयव्ययामध्ये सार्वजनिक संस्थांच्या वित्तीय व्यवहारांचा समावेश होतो. दोन्ही प्रकारच्या आयव्ययामध्ये काही बाबतीत साम्य आढळतो.

1. गरजांची तृप्ती:
गरजांची तृप्ती हे खाजगी आणि सार्वजनिक आयव्यय अंतिम उद्दिष्ट असते. व्यक्ती स्वतःच्या गरजांच्या पूर्ततेसाठी स्वतःची संपत्ती व उत्पन्न यांचा वापर करते. तर सरकारच्या सामुहिक गरजांच्या पूर्ततेसाठी उत्पन्न व संपत्तीचा उपयोग करते.

2. महत्तम कल्याण:
व्यक्ती आणि सरकार या दोघांसाठी हेतू महत्तम कल्याण साध्य करणे हाच असतो. व्यक्ती आपले आर्थिक व्यवहार स्वतःचे कल्याण करण्याच्या हेतूने करीत असतो. तर सरकार एकूण प्रजेचे महत्तम आर्थिक कल्याण साध्य करण्याच्या हेतूने आर्थिक व्यवहार करते.

3. कर्जाचा अवलंब:
जेव्हा खर्चासाठी उत्पन्न अपुरे पडते. तेव्हा व्यक्ती आणि सरकार हे दोन्ही गरजांच्या मार्गाचा अवलंब करतात. आणि परतफेड ही करतात.

4. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ:
व्यक्ती आणि सरकार या दोघांनी आपल्या उत्पन्नाच्या खर्चाशी मेळ कसा बसवायचा या समस्येची सोडवतूक करावी लागते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 17:03 ( 1 year ago) 5 Answer 6763 +22