क्रियापद म्हणजे काय in marathi?www.marathihelp.com

वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

क्रियापद ही संज्ञा विविध अर्थांनी वापरण्यात येते. व्याकरणरचनेच्या विविध परंपरांत क्रियापद ह्या संज्ञेची विविध लक्षणे दिलेली आढळतात. ह्यांपैकी काही लक्षणे लोकव्यवहारातही रुळलेली आहेत. एका प्रकारच्या व्याकरणाच्या नियमानुसार क्रियापद म्हणजे भाषेतील क्रियावाचक शब्द. "श्याम खातो" यात खातो हे क्रियापद आहे. त्यातला मूळ धातू खा हा आहे. मराठीतील सर्व धातू ’णे’कारान्त लिहिण्याची पद्धत आहे, त्यामुळे खा हा धातू शब्दकोशात खाणे असा दाखविला जातो.

असे असले तरी सर्वच क्रियापदे ’क्रिया’ दाखवीत नाहीत. उदा० सोने पिवळे असते. त्याला फार आनंद झाला. या वाक्यांतले ’असते’ आणि ’झाला’ ही अनुक्रमे ’असणे’ आणि ’होणे’ या धातूंपासून बनलेली क्रियापदे आहेत. परंतु ही क्रियापदे ’क्रिया’ दाखवीत नाहीत. त्यामुळे ’क्रियापदा’ची वेगळी व्याख्या करणे जरुरीचे आहे. अर्थाच्या आधाराने ती करणे तितकेसे सोपे नाही. मात्र क्रियापदाची दोन लक्षणे नक्की आहेत. पहिले क्रियाबोधकत्व आणि दुसरे वाक्यपूरकत्व. वाक्यात क्रियापद म्हणून आलेला शब्द काही तरी विधान करतो, आणि वाक्य पूर्ण करतो. क्रियापद क्रियेचा बोध करीत असल्याने तो शब्द काळाचाही बोध करतो. आज्ञार्थक आणि संकेतार्थक क्रियापदे काळाबरोबर अर्थाचाही बोध करतात.

रूपनिष्ठ व्याकरणाची तांत्रिक परिभाषा लक्षात घेतली असता क्रियापद ह्या शब्दाला एक विशिष्ट पारिभाषिक अर्थ आहे. वाक्याची फोड ही पदांत होते. ह्या पदांपैकी विशिष्ट तऱ्हेचे म्हणजे काळ (वर्तमान, भूत, भविष्य) आणि अर्थ (आज्ञा, विधि इ.) दार्शवणारे प्रत्यय लागलेले शब्द म्हणजे धातू. उदा. खा ह्या धातूला तो हा वर्तमानकालवाचक प्रत्यय लागला की खातो हे क्रियापद बनते. ह्या लक्षणात धातूचा अर्थ क्रिया हा असतो असे म्हटलेले नाही. त्यामुळे अस, हो इ. सामान्य अर्थी क्रियावाचक नसलेले शब्दही धातू ठरतात. कारण त्यांना विशिष्ट प्रत्यय लागतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 3895 +22