इंग्लंडचा अमेरिकेत किती वसाहती होत्या?www.marathihelp.com

इंग्लंडचा अमेरिकेत किती वसाहती होत्या?
सतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्यांत इंग्‍लंडच्या तेरा वसाहती होत्या.

या तेरा वसाहतींत स्थानिक वन्य जमाती, निग्रो गुलाम, इंग्रज, आयरिश, जर्मन, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज आदी यूरोपीय असा संकीर्ण समाज नांदू लागला. यांत बहुसंख्य इंग्रज होते आणि त्यांच्या भाषेला सर्वमान्यता लाभली होती. बहुतेक वसाहतींचा कारभार ब्रिटिश शासनाने नियुक्त केलेला गव्हर्नर स्थानिक प्रातिनिधिक संस्थांच्या सल्ल्याने चालवीत असे.

 वसाहतींचा वाहतूक-व्यापार इंग्‍लंडच्याच बोटींतून (वसाहतींना स्वतंत्र बोटी नसल्याने) चालला पाहिजे, वसाहतींनी कच्चा माल इंग्‍लंडलाच विकला पाहिजे, इंग्‍लंडचाच पक्का माल विकत घेतला पाहिजे, स्वतः पक्का माल तयार करता कामा नये, कोणत्याही देशांतून माल आयात केल्यास तो प्रथम इंग्‍लंडमध्ये उतरवून मग वसाहतींत जावा इ. नौकानयन-कायद्यांतील निर्बंधांमुळे इंग्रज व्यापाऱ्‍यांचा अमाप फायदा, तर वसाहतवाल्यांची कुचंबणा होई. ह्यामुळे वसाहतींचा औद्योगिक विकास अर्थातच अशक्य झाला होता.

वसाहतींतील इंग्रज इंग्‍लंडमधील इंग्रजांपेक्षा कनिष्ठ आहेत, असा सार्वत्रिक समज होता. याचे वसाहतवाल्यांना साहजिकच वैषम्य वाटे पण मायदेशाकडून मिळणाऱ्‍या संरक्षणाच्या मोबदल्यात सर्व निर्बंध व विषमता मान्य करणेच त्यांना भाग होते. तरीसुद्धा कागदोपत्री असलेल्या निर्बंधांची वसाहतवाले फारशी फिकीर करीत नसत. पण चोरट्या प्रकारांना पायबंद घालून, उत्पन्नातील गळती थांबविण्यासाठी ⇨सप्तवार्षिक युद्धाच्या (१७५६–६३) अखेरीस मायदेशींच्या शास्त्यांनी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली. चोरट्या व्यापारातील नफा घटताच वसाहतवाल्यांनी मायदेशाच्या शोषक नियमांविरुद्ध आंदोलन सुरू केले. साहजिकच सप्तवार्षिक युद्धाच्या भरतवाक्यानंतर लवकरच स्वातंत्र्ययुद्धाची नांदी म्हटली गेली.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 6229 +22