अर्थव्यवस्थेमध्ये किती क्षेत्र आहेत?www.marathihelp.com

अर्थव्यवस्थेची क्षेत्रे-
व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची पाच प्रकारची क्षेत्रे आढळून येतात –

1) प्राथमिक क्षेत्र –
नैसर्गिक साधन सामग्रीशी संबंधीत व्यवसाय या क्षेत्रात येतात.
उदा. शेती, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, खाणकाम, या व्यवसायांचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होतो.

2) व्दितीयक क्षेत्र –
प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तुवर प्रक्रिया करून दुसय्रा प्रकारच्या वस्तु तयार केल्या जातात. त्यामुळे यास उद्योग क्षेत्र असेही म्हणतात.
उदा. कारखानदारी, बांधकाम, वीजनिर्मिती, या व्यवसायांचा समावेश व्दितीयक क्षेत्रात होतो.

3) तृतीयक क्षेत्र –
प्राथमिक व व्दितीयक क्षेत्रांना पुरक सेवांचा समावेश तृतीयक क्षेत्रात होतो. याला सेवा क्षेत्र असेही म्हणतात.
उदा. व्यापार, वाहतुक, दळणवळण, संरक्षण, प्रशासन, यांचा समावेश तृतीयक क्षेत्रात होतो.

4) चतुर्थक क्षेत्र –
उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर या क्षेत्रामध्ये होतो. उच्च ज्ञानाशी संबंधित संकल्पनाची निर्मिती, संशोधन व विकास, यांचा संबंध चतुर्थक क्षेत्राशी येतो.
उदा. सॉफ्टवेअर, माहिती तंत्रज्ञान, संशोधन व विकास इ.

5) पंचम क्षेत्र –
पंचक क्षेत्रात समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रिये चा समावेश होतो.
उदा. सरकार, विज्ञान, विद्यापीठे, आरोग्य सेवा या क्षेत्रातील उच्च स्तरीय संचालक व अधिकारी यांचा समावेश होतो.






मालकीनुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे –
1) सार्वजनिक क्षेत्र-
2) खाजगी क्षेत्र-
3) संयुक्त क्षेत्र-
4) सहकारी क्षेत्र-



solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 13:22 ( 1 year ago) 5 Answer 8250 +22